परिसरातील प्रेक्षणीय स्थळे

परिसरातील प्रेक्षणीय स्थळे



  थिबा पॅलेस

        थिबा पॅलेस हे रत्नागिरीतले मोठे आकर्षण आहे. थिबा रोड थेट या ठिकाणी नेतो आणि भव्य पटांगणातील लाल रंगाची, मेंगलोरी कौलांची सुंदर वास्तु दृष्टीस पडते. बशह्मी पद्धतीच्या या वास्तूचे सौंदर्य विस्तीर्ण पटांगणामुळे अधिकच नजरेत भरते. ९७ वर्षांपुर्वीच्या या राजवाड्याचे धागे ब्रह्मदेशाशी (आताचे म्यानमार) जोडलेले आहेत. १८८५ च्या सुमारास ब्रह्मदेशाचा राजा थिबा - ज्याने तेथे सात वर्ष राज्य वेत्र्ले. त्याचा पराभव करुन ब्रिटीशांनी ब्रह्मदेश आपल्या ताब्यात घेतला आणि थिबा राजाला कैद वेत्र्ले. त्यानंतर त्याने पुन्हा उठाव करु नये, त्याचा त्याच्या प्रजेशी काहीही संबंध राहु नये यासाठी ब्रिटीशांनी त्याला रत्नागिरीत बंदिवान म्हणुन ठेवायचे ठरवले. १७ एप्रिल १८८६ रोजी थिबा राजाला त्याच्या परिवारासह कॅनिंग बोटीने मद्रासला (चेन्नई) व तेथुन क्लाईव्ह बोटीने रत्नागिरीत आणले गेले. रत्नागिरीत प्रथम ऑट्रम बंगल्यात व नंतर बेकर बंगल्यात ठेवण्यात आले. पुढे २७ एकर आणि साडे अकरा गुंठे विस्ताराच्या मोठ्या भुखंडावर एक लाख सदतीस हजार चारशे शहाऐंशी रुपये खर्च करुन तीन मजली प्रशस्त राजवाडा उभारला गेला आणि १३ नोव्हेंबर १९१० रोजी थिबा राजा आपल्या परिवारासह तेथे राहण्यास गेला. ३० वर्षांच्या कैदेनंतर १५ डिसेंबर १९१९ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी थिबा राजाचा मृत्यू झाला. अशा अनेक घटनांचे साक्षीदार असलेल्या या राजवाड्याच्या तळमजल्यावर संगमरवरी फरशीचं नृत्यगृह आहे. उंच गच्चीवरुन समोर पसरलेल्या विस्तीर्ण सागराचे दर्शन होते. छताला सुंदर नक्षीकाम केलेल्या लाकडी पट्टया लावलेल्या असून अर्धवर्तुळाकार खिडक्यांना रंगबिरंगी इटालियन काचा लावलेल्या आहेत. या राजवाड्याच्या मागे थिबा राजाने ब्रम्हदेशातुन आणलेली बुद्धाची मुर्ती स्थापन वेत्र्लेली आहे. राजवाड्याच्या मागील बाजूच्या भागात आता पुरातन वस्तूसंग्रहालय आहे. तळमजल्यावर कोकणातील व देशातील इतर भागात सापडलेल्या विविध प्राचीन मूर्ती मांडल्या आहेत, तर वरच्या मजल्यावर टूटू यांचा फोटो, जुन्या लाकडी खुर्च्या आणि कोकणातील प्राचीन मंदिरांची चित्र प्रदर्शनी आहेत. दुपारी १ ते १.३० जेवण वेळ व सोमवार साडून इतर दिवशी हे म्युझियम सर्वांसाठी खुले असते. येथून पूढे थिबा पॅाईंट नामक स्थानावर आता जिजामाता गार्डन उभे राहिले आहे. इथल्या मनोऱ्यावरून मोठे विहंगम दृश्य दिसते. भाट्ये नदी, राजीवडा बंदर, अथांग समुद्र आणि भगवती किल्ला या पार्श्वभूमीवर सुर्यास्त पाहण्यासाठी येथे नेहमीच गर्दी असते. अस्ताला जाणाऱ्या नारायणाचे वाटोळे बिंब हळूहळू क्षितिजाआड होत असते. दिवसभर राज्य करणारा तेजोभास्कर निस्तेज होत जातो, पाठीमागून अंधारही झाकोळुन येत असतो आणि नकळत त्या वेळी थिबा राजाच्या करुण कहाणीची आठवण होते.

  लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान

        रत्नागिरी शहरात मध्यवर्ती भागात टिळक आळीत एक टुमदार, कौलारु कोकणी घर आहे. दीडशे वर्षापुर्वी २३ जुलै १८५६ रोजी याच घरात लो. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला. मुळच्या श्रीमती. इंदिराबाई गोरे यांच्या या घरात टिळक कुटुंबीय भाड्याने राहत होते. लोकमान्यांचे वडील त्या वेळी शिक्षक म्हणून रत्नागिरीत नोकरीस होते. टिळकांचे मूळ गाव दापोली दाभोळ रस्त्यावरील चिखलगाव, ज्या ठिकाणी आता त्यांच्या घराच्या जोत्यावर टिळक १० वर्षे वास्तव्य होते. या ठिकाणी आता महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे विभागाचं कार्यालय आहे. बाहेरच्या आवारात लो.टिळकांचा पूर्णाकृती पुतळा आहे.