वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
सह्याद्रीच्या रांगांमधील हिरवीगार वनराई, स्वच्छ सुंदर रुपेरी समुद्रकिनारा तसेच आंबा, काजू, नारळ, पोफळी व वनस्पतींच्या हिरवळीने नटलेल्या निसर्गाची अप्रतिम
उधळण असलेल्या सर्वांगसुंदर अशा समुद्रकिनाऱ्यावर कोकणातील गणपतीपुळे हे येथील श्री गजाननाचे स्वयंभू देवस्थान तसेच पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले रमणीय ठिकाण गणपतीपुळे येथील श्रींचे वास्तव्य, त्यांचा महिमा, देवस्थानची माहिती, तेथील नित्यक्रम, उत्सव व इतर अनेक उपक्रम यांना
आतापर्यंत अनेक भक्तांनी भरभरून साहाय्य केले आहे. येथे येणाऱ्या भक्तांना यासंबंधी परिचय व्हावा या हेतूने हि वेबसाईट प्रकाशित करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
येथे येणाऱ्या भक्तांना श्री गजाननाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होता यावे व इथल्या निसर्गरम्य वातावरणात रंगून तन, मन व धनाने समृद्ध होता यावे यासाठी या सृष्टीचा
हा तारणहार विघ्नहर्ता गजाननाने सर्वांवर कृपादृष्टी ठेवावी, हीच सदिच्छा!