परिसरातील प्रेक्षणीय स्थळे
  किल्ले जयगड
        किल्ल्याच्या मुख्य प्रवेशारापर्यंत थेट मोटाररस्ता आहे. तेथे असलेल्या पोलिस चौकीपाशी वाहन थांबवून
आत जावे लागते. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस ५ दगडी तटबंदीमध्ये एक लहानसे दार व दगडी पायऱ्या दिसतात.
त्या थेट खाली जयगड बंदराकडे जातात. किल्ल्याची संपूर्ण तटबंदि आणि बुरुज आजही सुस्थितीत आहेत.
त्यावरुन मस्त फेरफटका मारता येतो. आत शिरताच समोर श्री गणपतीचे मंदिर दिसते.
एवूत्र्ण वीस बुरुज असलेला हा किल्ला विजापुरकरांनी बांधला पण त्यांना आपला अधिकार फार काळ टिकवता आला नाही.
संगमेश्र्वरच्या नाईकांनी तो विजापुरकरांकडून जिंकून घेतला. १५८५ आणि १५८८ मध्ये विजापुरकरांनी पोर्तुगीजांच्या मदतीने
तो पुन्हा जिंकण्याचे प्रयत्न केले. पण दोन्ही वेळेस त्यांच्या पदरी अपयशच आले.
त्यानंतर १७१३ मध्ये शाहू महाराजांच्या काळात हा किल्ला कान्होजी आंग्रेच्या ताब्यात होता.
मधल्या काळात तो मराठ्यांच्या ताब्यात कधी आला याची नोंद मिळत नाही.
पुढे इ.स. १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे हाही किल्ला विना प्रतिकार ब्रिटिशांच्या स्वाधिन करण्यात आला.
१८६२ पर्यंत येथे ५५ तोफा होत्या. आज एकही नाही. किल्ल्यात एका दुमजली पडक्या वाड्याचे अवशेष आणि तटबंदिवरच्या
चौकोनी टेहळणी बुरुज ज्याला माडीचा बुरुज म्हणतात एवढेच अवशेष शिल्लक आहेत.
जमिनीच्या बाजुने किल्ल्यास खंदक आहे. दरवाज्याजवळ गिलाव्यात कोरलेली कमळे आहेत.
किल्ल्याला समुद्राच्या बाजुने अगदी पाण्यालगतही तटबंदि आहे.
बाहेरच्या बाजुने सर्वत्र खडकाळ भाग असून त्यावर सतत पाण्याच्या लाटा आपटत असतात.
किल्ल्यावरील टेहळणी बुरुजावरुन दिसणारा सुर्यास्त वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा आहे.
  कऱ्हाटेश्वर
        जयगड किल्ल्याच्या डाव्या बाजुस एक त्रिकोणी स्तंभ दिसतो.
येथे डावीकडे वळणारा रस्ता कऱ्हाटेश्वर मंदिर आणि जयगड दिपस्तंभाकडे जातो. डोंगरकड्याकडच्या बाजुस समुद्राच्या दिशेने एका
मोठ्या खडकावर हे कौलारु मंदिर आहे. बांधीव पायऱ्या उतरुन या आवारात जाता येते.
जीर्णोद्धारीत मंदिरात शिवपिंडी आहे. मंदिराच्या बाजुला खाली समुद्राच्या बाजुने अजून खाली उतरण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.
तेथे गोमुखातून वाहणारा अखंड झरा आहे. या पाण्याची गोडी काही वेगळीच आहे. मंदिर आवारात बोभाटी गंगा म्हणुन एक स्थान आहे.
नजरेसमोरचा अथांग सागर आणि पाषाणाच्या काळ्या भिंतीवर धक्का मारुन उसळणाऱ्या लाटा निस्तब्ध निरखत रहाणे हा त्या
वातावरणातला अंतर्मुंख करणारा अनुभव आहे.
  लक्ष्मीकेशव मंदिर - कोळीसरे
        जयगडहून चाफे फाट्याकडे परत येताना चाफे फाट्याच्या ८ कि.मी. अलीकडे डावीकडे कोळीसरे गावाचा रस्ता पुत्र्टतो.
येथून सुमारे २ कि.मी. अंतरावर तीव्र उताराच्या नागमोडी रस्त्यावरुन पुढे जाताना उतार संपतो तेथेच पुन्हा उजवीकडे
खाली जाणारा कच्चा रस्ता दिसतो. तेथेच खाली श्री लक्ष्मीकेशव मंदिर आहे.
मोकळ्या पटांगणालगत खाली दरीत उतरणारी दगडी पाखाडी (पायऱ्या) दिसते. मंदिराचा परिसर नीरव शांतता आणि गर्द झाडीने वेढलेला आहे.
एका बाजुस डोंगर, दोन बाजुस सपाट जमीन आणि चौथ्या बाजुस खोल दरी असलेल्या या स्थानामध्ये बारमाही वाहणारा निखळ झरा आहे.
मन एकाग्र करणारी आध्यात्मिक शांतता, निर्जन अशी दाट झाडी आणि लक्ष्मीकेशवाचा निकट सहवास. मंदिरातील लक्ष्मीकेशवाची मूर्ती अतिप्राचीन आहे.
सुमारे पाच फुट उंचीची ही मुर्ती नेपाळमधील गंडकी नदीतल्या काळसर तांबुस रंगाच्या शाळीग्राम शिळेतुन घाविलेली असुन प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
मुख्य मुर्ती अतिशय देखणी असुन चतुर्भुज आहे. मूर्तीच्या खालच्या उजव्या हातात कमळ(पद्म), वरच्या उजव्या हातात शंख, वरच्या डाव्या हातात चक्र आणि खालच्या
डाव्या हातात गदा अशी आयुधे आहेत. हा पशंचग आयुध क्रम लक्षात घेता ही मुर्ती केशवाची ठरते. विष्णुमूर्तीच्या हातातील या आयुधांचा क्रम जसा बदलतो तशी त्या रुपाची
एकूण चोवीस नावे आहेत. या मुर्तींवरील कलाकुसर अतिशय सुंदर असुन प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत.