भक्तनिवास नियमावली

भक्तनिवास नियमावली



  भक्तनिवास येथे रहाणेसाठी सरकार मान्य ओळखपत्र असणे आवश्यक आहे. (आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
  खोली घेण्याची वेळ सकाळी १०:०० व खोली सोडण्याची वेळ दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:०० वाजेपर्यंत राहील.
  भक्तानिवासामध्ये जास्तीत जास्त तीन दिवस राहता येईल.
  एकटया व्यक्तीला खोली दिली जाणार नाही.त्यांची व्यवस्था डॉर्मेटरी मध्ये केली जाईल.
  खोली ताब्यात घेणेपुर्वी खोलीतील सामान बघुन घ्यावे.
  खोलीतील सामानाची मोडतोड केल्यास / नादुरुस्त केल्यास त्या सामानाची पूर्ण रक्कम भरून द्यावी लागेल.
  भक्तानिवासामध्ये कोणत्याही प्रकारची रूम सर्व्हीस दिली जाणार नाही.
  भक्तजनांनी आपल्या मौल्यवान वस्तु आपल्या जबाबदारीवर ठेवाव्यात.
  उतारुंचे वर्तन भक्तनिवास परिसराला शोभेसे असणे आवश्यक आहे.गैरवर्तन करताना आढळून आल्यास तात्काळ खोली सोडावी लागेल.
  खोलीत मद्यपान व मांसाहार करणेस सक्त मनाई आहे. तसेच खोलीमध्ये अथवा भक्तनिवास आवारात स्वयंपाक करू दिला जाणार नाही.तसे केल्यास खोली तात्काळ सोडावी लागेल.
  भिंतीवर रेघोट्या ओढणे / नावे लिहीणे असे प्रकार करून भिंत खराब करू नये.असे केल्याचे आढळल्यास नुकसान भरपाई द्यावी लागेल.
  रात्रौ ११.०० वाजेपर्यंत खोलीमध्ये परत येणे आवश्यक आहे.काही कारणाने उशीर होणार असल्यास तसे कार्यालयात आगाऊ कळवावे.
  काही कारणाने खोली रद्द केल्यास कोणत्याही प्रकारे पैसे परत केले जाणार नाहीत. (No refund on cancellation)
  पाळीव प्राणी आणणेस सक्त मनाई आहे.

भक्तनिवास सुविधा

  गरम पाणी वेळ सकाळी - ०६.०० ते ०८.००
  कॅन्टीन सुविधा – चहा / कॉफी / दूध :
      चहा,कॉफी,दुध मिळण्याची वेळ     - ६.३० ते १०.०० (सकाळी) व ०४.०० ते ०७.०० (संध्याकाळी)
      अल्पोपहार वेळ सकाळी               - ०७.०० ते १०.०० (सकाळी)
      भोजन वेळ दुपारी                        - १२.३० ते ०२.३० (दुपारी) (कुपन घेण्याची वेळ सकाळी ११.३० पर्यंत )
      भोजन वेळ रात्री                          - ०७.३० ते १०.०० (रात्री) (कुपन घेण्याची वेळ रात्री ०९.०० पर्यंत )
  वयोवृद्ध व्यक्तींसाठी व्हील चेअर उपलब्ध आहे.
  जनरेटर व्यवस्था उपलब्ध आहे.(BACKUP संध्याकाळी ०६.०० नंतर )